लॉकडाऊनच्या गंगेत काळाबाजार करणाऱ्यांनी घेतले हात धुवून – तंबाखू, गुटखा आणि गावठी दारुची चढ्या दराने चोरीछुपे विक्री

मुरबाड: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. मात्र बंदीच्या या गंगेत काहीजणांनी आपले हात चांगलेच धुवून घेतले आहेत.मुरबाडमध्ये लॉकडाऊनचा फायदा उठवत

मुरबाड: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. मात्र बंदीच्या या गंगेत काहीजणांनी आपले हात चांगलेच धुवून घेतले आहेत.मुरबाडमध्ये लॉकडाऊनचा फायदा उठवत बऱ्याच जणांनी तंबाखू आणि दारूच्या तलब बहाद्दरांच्या गरजेचा मोठा फायदा उठवला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वप्रथम राज्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आले. त्यानंतर कडक लॉकडाऊन सुरू झाले.त्यामुळे सिगारेट, तंबाखू, मावा, खर्रा, जर्दा, गुटखा, पान खाणाऱ्यांची पंचाईत झाली.सुरुवातीचे काही दिवस तलब बहाद्दरांनी दिवस कसेतरी ढकलले, मात्र जसजसे लॉकडाऊन वाढले तसे तलब बहाद्दरांच्या संयमाचा बांध फुटला व चोरीछुपे तंबाखूजन्य पदार्थांची मागणी वाढली.

सध्या तंबाखूजन्य सर्वच पदार्थांचे उत्पादन बंद असल्याने या पदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे,  अर्थातच या वस्तूंची विक्री सध्या लपूनछपून चढ्या भावाने सुरू आहे. यापूर्वी दोनशे रुपये किलो साधा सुटा तंबाखू ही आता काळ्याबाजारात आठशे रुपये प्रति किलो भावाने विकला जातोय.दहा रुपयांचा गुटखा सत्तर तर सिगारेट चाळीस रुपयांना विकली जात आहे. दहा रुपयांची तंबाखूची एक पुडी तर चक्क ऐंशी रुपयांना विकली जात आहे. ठिकठिकाणी आता वाईन शॉप आणि बियर शॉप उघडण्यास परवानगी दिली असली तरी, मुरबाड तालुक्यात ही परवानगी फक्त  ग्रामपंचायतींना दिल्याने मुरबाडमधील एकमेव वाईन शॉप बंद आहे.गावोगावी असणारे बियर शॉप जरी सुरू असले तरी व्हिस्कीप्रेमींची मात्र सध्या तरी अडचणच आहे.त्यामुळे नाईलाजास्तव या व्हिस्कीप्रेमींनी सुरुवातीपासूनच आपला ओढा गावठी दारूकडे कायम ठेवला आहे.सध्या गावठी दारूची एक लिटरची बाटली सातशे ते आठशे रुपयांना रोजच्या ग्राहकांना घरपोच विकली जात आहे.