पाणी टंचाईग्रस्त भागात तहसीलदारांनी केली पाहणी, पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला दिली भेट

वाडा : भीषण पाणी टंचाईग्रस्त असलेल्या वाडा तालुक्यातील वरसाळे गावातील नवापाडा गावात आज वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी प्रत्येक्ष भेट दिली. पाणी आणण्यासाठी गेल्यावर दुखापतग्रस्त झालेल्या महिलेच्या

वाडा : भीषण पाणी टंचाईग्रस्त असलेल्या वाडा तालुक्यातील वरसाळे गावातील नवापाडा गावात आज वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी प्रत्येक्ष भेट दिली. पाणी आणण्यासाठी गेल्यावर दुखापतग्रस्त झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची मदत  त्यांनी देऊ केली. यावेळी गावातील सरपंच प्रकाश शेलार हे उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील वाडा तालुक्यातील वरसाळे गावात भीषण पाणी टंचाई होती. इथल्या नवापाड्यातील एक महिला पाणी आणण्यासाठी  सायंकाळच्या सुमारास विहिरिवर गेली.विहिरी खोल आणि दगडी बांधकामाची होती.पाणी कमी होते.म्हणून तिने विहिरीत उतरायचे धाडस केले आणि तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. विहिरीत पडल्याने नवापाडा राही किनर या महिलेला हाताला,डोक्याला आणि कमरेला मार लागला.

या गावाातील ग्रामपंचायत सरपंच प्रकाश शेलार यांनी पंचायत समितीकडे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. ही मागणी पुर्ण कररण्यात दिरंगाई झाली आणि या महिलेला पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ आली. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दुसऱ्या दिवशी टंचाईग्रस्त पाड्यात पाणी टँकरने पुरविण्यात येत आहे . तसेच  वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास या  ठिकाणी भेट देऊन दुखापतग्रस्त महिलेच्या घरातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.