ठाण्यात कोरोना रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व पालिकांना आदेश

ठाणे - राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. मुंबई, पुण्यासह ठाण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या आकडा कमी होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी

 ठाणे – राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. मुंबई, पुण्यासह ठाण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या आकडा कमी होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये ठाण्यातील सर्व पालिकांनी ट्रॅक अॅन्ड ट्रेस यावर जास्तीत जास्त भर देऊन रुग्ण शोधण्याचे आदेश दिले आहेत. 

ठाण्यातील बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, उपयुक्त अश्र्विनी भिडे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही उपाययोजना राबविण्यात सांगितले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईसह इतर ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रकरण अधिक गंभीरतेने हाताळले जावेत. रुग्णांच्या बाबतीत ट्रॅक आणि ट्रेस करा, त्यांचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, यानुसार कार्यपद्धतीने उपचार करा, सामान्य रुग्णांना कोरोना बाबत जनजागृत करा. रुग्णालयातील बेड्स ची उपलब्ध करा आणि ती माहीती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा. कोरोना रुग्णांचे वर्गीकरण करुन त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करावा. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.