टॅटूमुळे झाली खुनाची झाली उकल, दोन आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताची पत्नी आणि आरोपी साजन यांच्यात प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून नेहमी भांडण होत होती, त्यामुळेच ही हत्या झाली असावी. असा संशय आहे.

  सोमवारी उल्हासनगर येथील चिंचपाडा परिसरात असणाऱ्या गावदेवी तलावात एकाचा मृतदेह तरंगताना आढळला. टॅटूमुळे या मृतदेहाची ओळख पटली आहे. नवी मुंबईतल्या रबाळे येथील एका नाका कामगाराचा हा मृतदेहं असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

  या नाका कामगाराचे अपहरण करून हत्या केल्याचा संशय विठ्ठलवाडी पोलीसांना आला. त्यानुसार विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  नेमकं काय घडलं?

  सोमवारच्या रात्री गावदेवी तलावात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथकाने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील एका रुग्णालयात पाठवण्यात आला.

  मयताचे शरीरावर टॅटू गोंदलेला असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी सर्व पोलिसांना पाठवली. या माहितीच्या आधारे हा मृतदेह चंद्रकांत शेलार (29) या नाका कामगाराचा असून तो नवी मुंबई येथील रबाळे येथून हरवला असल्याचे समोर आले. टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली आणि दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. साजन मारूती कांबळे (26) आणि डिवाईन तेलेस घोन्साळवीस असे अरोपींचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताची पत्नी आणि आरोपी साजन यांच्यात प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून नेहमी भांडण होत होती, त्यामुळेच ही हत्या झाली असावी. अशी प्राथमिक माहिती आहे, पुढील तपास सुरू आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.