खाजगी अनुदानित शिक्षकांच्या कोरोना रुग्णांबाबतच्या सेवाकार्याचा सहानभूतीपूर्वक विचार करावा – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

डोंबिवली : प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शिक्षकांना कोरोना रुग्णांच्या सेवाकार्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. या विषयाचे निर्देश पत्राद्वारे प्रत्येक शिक्षकांना देण्यात आले

 डोंबिवली : प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शिक्षकांना कोरोना रुग्णांच्या सेवाकार्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. या विषयाचे निर्देश पत्राद्वारे प्रत्येक शिक्षकांना देण्यात आले आहेत. मात्र असे होत असतांना या शिक्षकांचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिले आहे. विशेष म्हणजे परिषद अखिल भारतीय राष्ट्रीय महासंघ व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाशी संलग्न परिषदेने निवेदनाद्वारे अनेक मागण्या केल्या आहेत.

परिषदेने आपल्या मागणीत म्हटले आहे की, या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच टक्के शिक्षकांची नियुक्ती करावी. संपूर्ण सुरक्षा किट देण्यात यावे. प्रत्येक शिक्षकाला ५० लाखांचा विमा दिल्याचे अचूक निर्देश आदेश पत्रात नमूद करावे. निवासस्थानाजवळचे क्षेत्र देण्यात यावे. योग्य प्रक्षिक्षण व खबरदारीच्या सूचना व प्रसंगानरूप देण्यात याव्यात. काम करताना काही विपरीत घडले तर कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत त्वरित सामावून घेण्यात यावे. अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून याचा सहानभूतीपूर्वक विचार करावा असे म्हटले आहे. तसेच त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका आणि माध्यमिक-प्राथमिक शिक्षणाधिकारी, पदवी मददार संघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आदींना याची माहिती दिली आहे.