ती शिक्षिका लस घ्यायला म्हणून गेली अन् गाडी खड्ड्यात अडकून झाला अपघात, पुढे काय झालं ते तुम्हीच वाचा

लस घ्यायला गेलेल्या एका शिक्षिकेवर काळानं घाला (Teacher`s Death In An Accident) घातला आहे.

    कल्याण:  प्रशासन कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर (Vaccination) भर देत आहे. लोकही लसीकरण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अशातच लस घ्यायला गेलेल्या एका शिक्षिकेवर काळानं घाला (Teacher`s Death In An Accident) घातला आहे.

    लसीकरणासाठी जात असताना वाटेतील एका खड्ड्यात स्कुटी अडकल्यानं अपघात (Accident) होऊन शिक्षिकेचा मृत्यू (Death) झाला आहे.

    कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरासोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात जोराने आदळली.

    यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेऊ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.