शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पॉक्सो अंतर्गत टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन (Titwala police station) हद्दीतील नादंप येथील खाजगी शिकवणी क्लासेसमधील (Private Classes) अल्पवयीन मुलीचा खाजगी शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली.

कल्याण : टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन (Titwala police station) हद्दीतील नादंप येथील खाजगी शिकवणी क्लासेसमधील (Private Classes) अल्पवयीन मुलीचा खाजगी शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. टिटवाळा पूर्वेतील नादंप रोड परिसरातील खाजगी कोचिंग क्लासेसमधील आरोपी खाजगी शिक्षक देविदास त्रिबंक शेलार (Devidas Shelar) वय ४५ वर्षे याने प्रश्नपत्रिका लिहून देण्याच्या बहण्याने पिडित १५ वर्षे अल्पवयीन मुलीस क्लास संपल्यानंतर क्लासमध्ये थांबवुन पिडित अल्पवयीन मुलगी बेंचवर बसलेली असताना तिच्या हाताला धरून ओढत फळ्याकडे नेले मला तुझ्यासबोत सेक्स करावयाचा आहे. अशी मागणी करून पिडित अल्पवयीन विद्यार्थी मुलीस मिठी मारली व विनयभंग केला.

प्रसंगावधान साधत पिडित मुलीने आपली सुटका करून घेतली. याप्रकरणी पिडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपी देविदास शेलार यांच्यावर भा.द.वि कलम ३५४ अ, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करीत तातडीने पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलिसांनी अटक केली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड डॉ. बसवराज शिवपुरे यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि स्वाती जगताप या करत आहेत. आरोपीस न्यायलयात हजर केले.असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.