रेड झोन जिल्ह्यांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये – भाजप शिक्षक आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. अद्याप कोणत्याही अनुदानित शाळेत इय्यता १ ली ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत

कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. अद्याप कोणत्याही अनुदानित शाळेत इय्यता १ ली ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत  त्यामुळे यावर्षी बरेच शिक्षक पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे अशा  परिस्थितीत अनुदानित शाळेतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त करू नये, अशा मागणीचे निवेदन  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड,  शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव  यांना भाजप शिक्षक आघाडीचे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी पाठविले आहे.

आता लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळेतील प्रवेशप्रक्रिया रखडल्या आहेत. पुढील शैक्षणिक सत्राच्या संपूर्ण वेळापत्रकाचे नियोजन बदलणार असल्याचे स्पष्ट दिसते. अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही फार चिंतेत सापडले आहेत. कारण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्यांची पदे मंजूर होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पट कमी झाला तर शिक्षकांचाही पट कमी होऊन त्यांना अतिरिक्त होण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षक समुदाय प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे अनिल शिवणकर यांनी सांगितले. याआधी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणीदेखील भाजप शिक्षक आघाडीने केलेली असून अद्याप शासनाने त्यावर काही निर्णय न घेल्याने शालेय प्रशासनाची चिंता वाढली आहेत. लास्ट वर्किंग डे १२ मे ला संपत असून लॉकडाऊन मात्र १७  मे पर्यंत असल्यामुळे  विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर याचा निश्चितच विपरीत परिणाम होऊन पुढील शैक्षणिक सत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात.  त्यामुळे निदान रेडझोन जिल्ह्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात २०२०-२१  मध्ये अतिरिक्त ठरविण्यात येवू नयेत व त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी  भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ कल्पना पांडे, डॉ उल्हास फडके, विकास पाटील, अनिल शिवणकर, एन. एम. भामरे, विनोद शेलकर, मिलिंद विखारे, सुभाष सरोदे आदींनी केली आहे.