Rapist will get severe punishment in Pakistan, rapist will be made

दहावीच्या अभ्यासात(Study Of Tenth Exam) मदत करण्याच्या बहाण्याने सतरा वर्षीय तरुणाने आपल्याच १५ वर्षांच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार(Rape Case In Navi Mumbai) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    नवी मुंबई : दहावीच्या अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने सतरा वर्षीय तरुणाने आपल्याच १५ वर्षांच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे विद्यार्थिनी गरोदर राहिली आहे. आरोपी तरुणावर डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल(Crime) केला आहे. नवी मुंबईतील(Navi Mumbai Crime) जुईनगर( Rape Case In Juinagar) परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

    पीडित अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. दोघेही भाऊ -बहिण जुईनगर भागात एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडितेला दहावीच्या अभ्यासासाठी मदत करत होता.पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती गेल्या काही महिन्यांपासून आरोपीच्या घरी जात होती. अभ्यासाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले.

    पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिचे कुटुंब तिला डोंगरीतील बालगृहात घेऊन आले. शुक्रवारी मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तिथे पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.डोंगरी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक शबाना शेख यांनी गुन्ह्याच्या नोंदणीला दुजोरा दिला. डोंगरी पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. पुढील तपासासाठी हे प्रकरण नेरूळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.