गुजरातचा मृत्युदर सांगा, जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना टोला

ठाणे - राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखांच्या घरात पोहोचला आहे. याचाच फायदा घेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कलगीतुरा रंगला आहे.

 ठाणे – राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखांच्या घरात पोहोचला आहे. याचाच फायदा घेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कलगीतुरा रंगला आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीला वाढता कोरोना बाधितांचा आकडा धरुन कोंडीत धरले आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. त्यातच राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत विरोधकांवर टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की! असा सवाल केला आहे.