भिवंडीत सोनाळे येथील कापड कारखान्यास भीषण आग

भिवंडी :भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील एका कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीस भीषण आग लागून आगीत तळ अधिक दोन मजली संपूर्ण इमारत जळून खाक झाली असून या आगीत कोट्यवधी रुपयांची

भिवंडी :भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील एका कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीस भीषण आग लागून आगीत तळ अधिक दोन मजली संपूर्ण इमारत जळून खाक झाली असून या आगीत कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री व तयार कपडा कच्चा माल जळून खाक झाला आहे .

सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री राज लक्ष्मी हायटेक पार्क येथे आहुजा सॅन फॅब प्रा ली या अत्याधुनिक यंत्रमागावर कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीस रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ,आग भडकत गेल्याने आगीच्या ज्वालांनी तळ अधिक दोन मजल्या पर्यंत पोहचत सर्व इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली भिवंडी व कल्याण डोंबिवली अग्निशामक दलाच्या एकूण चार गाड्यांनी शेकडो टँकर पाण्याच्या मदतीने आग विझविण्या साठी पराकाष्ठा केली तरी बारा तासा नंतर ही आग धुमसत होती .