lockdown

ठाण्यात (thane lockdown)हॉटस्पॉटमध्येदेखील(lockdown in thane) लॉकडाऊन नसेल.जे नियम इतर भागांमध्ये लागू आहेत तेच नियम कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉटमध्ये देखील लागू असणार असल्याचे समजते.

    ठाणे : ठाणे महापालिकेने(thane corporation) आपल्या लॉकडाऊनच्या(lockdown) निर्णयावरून घोलांटी उडी घेतली आहे. काल काढलेल्या लॉकडाऊनच्या नोटीफिकेशननंतर पालिका आज नवे पत्रक काढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात हॉटस्पॉटमध्येदेखील लॉकडाऊन नसेल.जे नियम इतर भागांमध्ये लागू आहेत तेच नियम कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉटमध्ये देखील लागू असणार असल्याचे समजते. कोणतेही नवीन निर्बंध घातले जाणार नाहीत.

    काल ठाणे पालिकेने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हणण्यात आले होते, की हॉट स्पॉटमध्ये लॉकडाऊन असेल तर बाकी ठिकाणी मिशन बिगीन अगेनचे नियम कायम राहतील.

    अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. गोंधळ उडाला. राज्य सरकारकडूनदेखील पालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ठाणे पालिका प्रशासनावर ओढवली आहे. त्यामुळे एकाच रात्रीमध्ये ठाणे पालिकाने पलटी मारून निर्णय बदलला. हॉटस्पॉटमध्येही सर्व आस्थापने चालू असणार आहेत. मात्र या परिसरावर पालिका करडी नजर ठेवणार आहे.