vipin sharma visit thane

ठाणे : शहरात कोरोनाच्या संसर्ग कमी होत असल्याने ठाणे महापालिका(thane corporation) आयुक्त डॅा. विपिन शर्मा(commissioner vipin sharma) यांनी आपला मोर्चा आता स्वच्छता मोहिमेकडे(cleaning drive) वळवला आहे.

ठाणे : शहरात कोरोनाच्या संसर्ग कमी होत असल्याने ठाणे महापालिका(thane corporation) आयुक्त डॅा. विपिन शर्मा(commissioner vipin sharma) यांनी आपला मोर्चा आता स्वच्छता मोहिमेकडे(cleaning drive) वळवला आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी आयुक्त शर्मा रस्त्यावर उतरले.

महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी बारा बंगला रोड येथून चालतच साफसफाई कामाची पाहणी केली. यामध्ये बारा बंगला रोड, भीमशक्ती चौक, स्टेशन रोड, कोपरी ब्रिज आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची त्यांनी पाहणी केली. महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर २०२० ते १६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ .शर्मा रोज विविध ठिकाणांची स्वच्छता कामाची पाहणीसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.