corona virus

ठाण्यात(thane) दिवाळीनंतर कोरोना रुग्णाच्या(corona patients) संख्येत वाढ होताना दिसत असून दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाण्यातील एकही कोरोना सेंटर(corona centre) बंद झाले नाहीत, असे मत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केले.

ठाणे : ठाण्यात(thane) दिवाळीनंतर कोरोना रुग्णाच्या(corona patients) संख्येत वाढ होताना दिसत असून दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाण्यातील एकही कोरोना सेंटर(corona centre) बंद झाले नाहीत, असे मत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना रुग्णालय, क्वारंटाईन सेंटर बंद झाले असल्याच्या उगाचच अफवा पसरू नये, असे आवाहन करू नये असे देखील शर्मा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ठाणेकर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, नियमाचे पालन करावे, उगाचच गर्दी करू नये अशी विनंती एकप्रकारे विपीन शर्मा यांनी केली आहे.
कोरोनाला आळा बसावा तसेच संसर्ग वाढू नये यासाठी पालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे. तसेच त्रिसूत्री योजनेचा वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
दिवाळीचा सण नुकताच झाला असून येत्या हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ठाण्यातील कोणतेही कोविड रुग्णालय अद्याप बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही अशी ठोस माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बोलताना दिली. दरम्यान या काळात कोणीही गाफील राहू नये. बाजारपेठ मध्ये गर्दी होणार नाही,शोसल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे तसेच नागरिकांनी सिनिटायझर चा वापर करावा, राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेदेखील आवाहन यावेळी शर्मा यांनी केले.