ठाणे पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आयुक्तांची अनोखी शक्कल, कर वसुली झाली नाही तर अधिकाऱ्यावरच कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने कर वसुलीवर(tax collection) जास्त भर दिला जात असून सद्यस्थितीत ठाणे महापलिकेची आर्थिक स्थिती चांगली असली तरी येत्या काही दिवसांत अजून पालिकेच्या तिजोरीत अधिक उत्पन्न वाढावे यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा(commisioner vipin sharma`s new idea for tax collection) यांनी नवी शक्कल लढवली आहे.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या(thane corporation) तिजोरीत खडखडाट झाला असला तरी विविध माध्यमांतून उत्पन्न येत आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने कर वसुलीवर(tax collection) जास्त भर दिला जात असून सद्यस्थितीत ठाणे महापलिकेची आर्थिक स्थिती चांगली असली तरी येत्या काही दिवसांत अजून पालिकेच्या तिजोरीत अधिक उत्पन्न वाढावे यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा(commissioner vipin sharma`s new idea for tax collection) यांनी नवी शक्कल लढवली आहे.

मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देतानाच महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व प्रभाग समितीस्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नवीन मालमत्तांचा शोध घेवून त्यांना कर आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रात मालमत्ता व पाणी पुरवठा कर वसुली मोहीम सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे विभाग प्रमुखांची बैठक घेवून कर वसुलीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे हे उपस्थित होते.

महानगरपालिकेच्यावतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता  मोठया प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय देण्यात आलेले दैनंदिन उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करून वसुलीचा दैनिक आढावा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका क्षेत्रातील नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेशही सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले असून नवीन मालमत्तांना कर आकारणी करून महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच जे थकबाकीदार पाणीपुरवठा कर भरणार नाहीत त्यांची नळ संयोजने खंडीत करून पाणीपुरवठा बंद करण्यासोबतच जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.