attack on tmc employee

माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे(kalpita Pimple) यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने चाकूने हल्ला(Attack By Knife In Thane) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  ठाणे: ठाण्यात (Thane)एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे(kalpita Pimple) यांच्यावर घोडबंदर येथील एका फेरीवाल्याने चाकूने हल्ला(Attack By Knife In Thane) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटावर चाकूने हल्ला झाला असून त्यांची तीन बोटे छाटली असून डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पिंपळे यांना तात्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे ठाण्यातील फेरीवाल्याची मुजोरी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरु असून शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. दरम्यान घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर अमरजीत यादव या भाजीवाला विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली असून गंभीर दुखापत झाली आहे. तर सुरक्षारक्षकाच्या ऐका बोटाला दुखापत झाली आहे.

  अमरजीत यादव या हल्लेखोर भाजी विक्रेत्यांना कासारवडवली पोलिसांनी केली अटक करण्यात आली असून या हल्यामुळे ठाणे महापलिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील मनात घडकी भरली होती, तर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दुरूनच फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हा हल्ल्यामुळे फेरीवाल्यांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

  अधिकाऱ्यांवर हल्ला निंदनीय – पालकमंत्री एकनाथ शिंदे
  अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहेत. महिला अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा निदनिय असून हल्लेखोरांना पकडण्यात आले आहे. दरम्यान प्रशासन पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी असून हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

  ही विकृती ठेचुन काढू ; कारवाई थांबणार नाही – महापौर नरेश म्हस्के
  हल्लेखोरांनी केलेला हल्ला म्हणजे ही विकृती आहे. गेल्या २ महिन्यापासून ठाण्यात कारवाई सुरू असून ही विकृती आम्ही ठेचून काढू आणि शहरात सुरू असलेली कारवाई थांबणार नाही.