Global Hospital

ठाण्यातील(thane) कोरोना रुग्णवाढीमुळे(corona patients) खासगी डॉक्टरांना (private doctors clinic)पुन्हा कामाला लागण्याचे आदेश ठाणे महापालिकेने काढले आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी एकप्रकारे ‘जागते रहो’ असे सांगत सेवा पुरवावी आणि यामध्ये कोणतीही हयगय करू नये अशी सूचना केली आहे.

  ठाणे:  ठाण्यात(thane) कोरोनाने(corona) पुन्हा एकदा मुसंडी मारली असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी महापालिका हद्दीत तब्बल १ हजार हुन अधिक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच रुग्णवाढीमुळे खासगी डॉक्टरांना पुन्हा कामाला लागण्याचे आदेश ठाणे महापालिकेने काढले आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी एकप्रकारे ‘जागते रहो’ असे सांगत सेवा पुरवावी आणि यामध्ये कोणतीही हयगय करू नये अशी सूचना केली आहे.

  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून प्रत्येक प्रभागात रुग्ण वाढत आहेत. छोटी मोठी आजार असलेल्या रुग्णासोबतच तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद ठेवावी तसेच कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या प्रत्येक रुग्णांच्या उपचारावर लक्ष देण्याच्या सूचना यावेळी महापालिकेने केल्या आहेत.

  ठाण्यातील गल्लीबोळात अंदाजे एकूण ४ हजारच्या आसपास खासगी डॉक्टरांचे क्लिनिक आहेत. या सर्व डॉक्टरांना महापलिकेने पत्रक धाडले असून जवळच्या आरोग्य केंद्राववरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा तसेच नागरिकांना योग्य सेवा पुरवावी आणि या काळात जर जाणूनबुजून क्लीनिक बंद ठेवले तर त्या डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेशच एकप्रकारे ठाणे महापालिकेने दिले आहेत. काही दिवसांत कोरोनावर निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्रिसूत्री नियमावलीचे पालन करावे असे महापलिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

  कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासन कंबर कसून काम करत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे बेडदेखील वाढवण्यात येत आहेत. शासनाच्या प्रत्येक नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

  - डॉ.राजू मुरुडकर,मुख्य वैद्यकीय अधिकारी

  प्रत्येक डॉक्टरने १० रूग्णांचा आढावा घ्यावा
   प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या जवळच्या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या आणि होम क्वारंटाईन असलेल्या १० रूग्णांचा आढावा दररोज घ्यावा आणि प्रत्येक रुग्णांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी,अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच या डॉक्टरांनी व्यवसायिक फी आकारून सेवा द्यावी. यामध्ये कोणीही दुर्लक्ष करू नये आणि क्लिनिक बंद ठेवू नये, अशी सूचना यावेळी महापलिकेने दिली आहे.

  ठाण्यातील २ हॉटेल विलगीकरणासाठी
  मागील वर्षी कोरोना काळात ठाण्यातील अनेक हॉटेल क्वारंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू ओसरत चाललेल्या कोरोनामुळे ती हॉटेल कोरोटाईनसाठी काही काळ बंद करण्यात आली होती.मात्र आता पुन्हा दोन हॉटेल विलगिकरणासाठी ठेवण्यात आली असून यामध्ये लेरिडा हॉटेल आणि साऊथ कोष्ट ही हॉटेल याचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यामध्ये फी आकारण्यात आली असून डॉक्टर, स्टाफ याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.