dance bar in thane

सोशल डिस्टन्सिंग(social distancing), मास्क(mask) आणि सॅनिटायजर(sanitizer) वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई(action on dance bar) करूत ते पाचही बार सोमवारी रात्री उशीरा सील करण्यात आले आहेत.

    ठाणे : सोशल डिस्टन्सिंग(social distancing), मास्क(mask) आणि सॅनिटायजर(sanitizer) वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई(action on dance bar) करूत ते पाचही बार सोमवारी रात्री उशीरा सील करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

    कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली.

    dance bar

    या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा ऑर्केस्ट्रा बार उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला. त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले.

    दरम्यान, या पाचही आस्थापनांवर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिला आहे. तसेच नियम मोडणाऱ्या बार,पब,ढाब्यावर महापालिका प्रशासन आणि ठाणे पोलिसांचे करडी नजर असणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.