tmc war room

वॉर रूममधून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी ठाणेकरांकडून प्राप्त होत होत्या. आता ठाणे महापालिकेच्या आयुक्त डॉ.विपीन शर्मा(dr vipin sharma`s call unanswered by war room)यांना देखील याचा साक्षात अनुभव आला आहे.

  वसंत चव्हाण, ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने(corona second wave) कहर केला असताना रुग्णांना वेळेवर माहिती किंवा सुविधा मिळाव्यात यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आध्यावत असा वॉर रूम(thane corporation war room problem) उभारण्यात आले आहे. मात्र या वॉर रूममधून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी ठाणेकरांकडून प्राप्त होत होत्या. आता ठाणे महापालिकेच्या आयुक्त डॉ.विपीन शर्मा(dr vipin sharma`s call unanswered by war room)यांना देखील याचा साक्षात अनुभव आला आहे.

  बुधवारी आयुक्त आणि पालिका आधिकरी यांनी हाजुरी येथील वॉर रूमला भेट दिली. यावेळी दिलेल्या फोन नंबरपैकी आयुक्त शर्मा यांनी फोन केला असता त्यांच्या कॉलला देखील उत्तर मिळाले नसल्याचा प्रकार घडला. एक ऑपरेटर दोन फोन वापरत असल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आले. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व डेटा ऑपरेटरशी संवाद साधला.

  ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड-१९ चा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त करत असून कोविड-१९ संदर्भात उपलब्ध ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड तसेच इतर मुलभूत माहिती आणि सूचना ठाणेकरांना देण्यासाठी वॉर रूमची उभारणी केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वॉर रूम मधील फोन हे नेहमीच व्यस्त किंवा प्रतीक्षेत असल्याने ठाणेकर नागरिककांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.

  वॉर रूममधून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने स्वतः आयुक्तांनी वॉररूमला भेट दिली. त्यांनतर आयुक्तांना देखील अशाच प्रकारचा अनुभव आला. आयुक्त शर्मा यांच्या समोर हा प्रकार घडल्याने मनुष्यबळ कमी असल्याचे निदर्शनास आले.

  वॉर रूममध्ये एक कॉल सुरू असेल तर दुसरा कॉल उचलता येत अशी तक्रार कर्मचारी करत असताना मनुष्यबळ वाढवले पाहिजे असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. २३ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातील वॉर रूम मध्ये फक्त १० कर्मचारी काम करत आहेत. नागरिकांचा एखादा फोन आला की कमीत कमी ५ ते १० मिनिटे माहिती देण्यासाठी लागत आहेत. रुग्णाच्या पाठपुराव्यासाठीदेखील करण्यात येतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वॉर रूममध्ये देखील मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे.

  महापालिकेच्या या वॅाररूमध्ये तीन सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी +९१८६५७९०६७९१, +९१८६५७९०६७९२, +९१८६५७९०६७९३, +९१८६५७९०६७९४, +९१८६५७९०६७९५, +९१८६५७९०६७९६, +९१ ८६५७९०६७९७, +९१८६५७९०६७९८, +९१ ८६५७९०६८०१ आणि +९१८६५७९०६८०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी एखादा क्रमांक व्यस्त लागल्यास दुसऱ्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केली आहे.

  ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ विपीन शर्मा म्हणाले की, वॉर रुमचे १० संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वॅार रूमध्ये २४ तास अधिकारी, डॉक्टर्स आणि डेटा ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले आहेत. रूग्णांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, बेड उपलब्धतेची अचूक माहिती देण्याच्या सूचना वॉर रूममधील अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.