It is the responsibility of the state government to get reservation for the Maratha community, no one should do politics: Eknath Shinde

सगळ्यांनीच खबरदारी घेण्याची आवश्यकता असून मास्कचा(mask) वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे(social distancing) काटेकोर पालन करून शासनाला पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde appeal) यांनी सोमवारी ठाणेकरांना केले.

    ठाणे: कोरोनावर(corona) आपण नियंत्रण मिळवले आहे, असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची(corona affected patients) संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घेण्याची आवश्यकता असून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून शासनाला पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde appeal) यांनी सोमवारी ठाणेकरांना केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची बैठक घेऊन शहर, तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लग्नसमारंभ, सोहळे, राजकीय कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम यांच्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, हे पाहाणे प्रशासनाची जबाबदारी असून लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

    ज्या ज्या विभागात कोव्हिडचे प्रमाण वाढत आहे, तिथे विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. पूर्वी ज्याप्रमाणे कंटेनमेंट झोन तयार केले होते, त्याच धर्तीवर कठोरपणे नियमांचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र त्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.