Repercussions of change of officers in the General Assembly All departments of TMC will have operations Mayor Naresh Mhaske

नागरिकांनी नियम पाळून(corona rules) जबाबदारीने वागावे अन्यथा लॉकडाऊन(lockdown in thane) अटळ आहे, नागरिकांनी सहकार्य न केल्यास नागरिकांमुळेच लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (naresh mhanske) यांनी स्पष्ट केले.

    ठाणे: ठाणे महापालिका (thane corporation)कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा मर्यादित असला तरी भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी स्वत:च दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. तसेच मास्कचा वापर कटाक्षाने करावा. नागरिकांनी नियम पाळून जबाबदारीने वागावे अन्यथा लॉकडाऊन अटळ आहे, नागरिकांनी सहकार्य न केल्यास नागरिकांमुळेच लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

    ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी या संदर्भात आढावा घेण्यासाठी सोमवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत महापालिका पदाधिकारी व
    कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन अत्यंत चांगल्या प्रकारे करीत आहे. मात्र मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढल्याने गैरसोय होण्यासाठी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे, रुग्ण्वाहिका व आवश्यक औषधसाठा करणे याबाबत प्रशासनास सूचित करण्यात आले.

    विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा गैरवर्तणूक नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असा निर्णय महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान प्रभाग समिती दक्षता समित्यांची बैठक आयोजित करून त्या समित्यांमार्फतही कोविड-१९ नियंत्रण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

    ठाणे शहरातील सर्वच ठिकाणी फेरीवाले कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रभागसमिती स्तरावरील सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याबाबतही या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असताना वैद्यकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास आपण कोरोनावर नियंत्रण आणू शकतो,असा विश्वास महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला.