thane commisioner vipin sharma

दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने आयोजित बैठकीत भाजपा दिव्यांग सेलच्या शिष्ट मंडळासोबत आयोजित बैठकीत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिव्यांगांचा सगळे प्रश्न सोडवणार असल्याची स्पष्ट ग्वाही दिली.

ठाणे : ठाणे(thane) महानगरपालिका दिव्यांग(divyang) व्यक्तींच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असून दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाकरीता उपलब्ध करून देण्यात येणारे स्टॉल, बीएसयूपी अंतर्गत हक्काच्या घरांचा ताबा देणे आदी महत्वपूर्ण प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(vipin sharma) यांनी दिली.

दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने आयोजित बैठकीत भाजपा दिव्यांग सेलच्या शिष्ट मंडळासोबत आयोजित बैठकीत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट ग्वाही दिली. भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग सेलच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना देण्यात आले होते. या सर्व मागण्यांबाबत आमदार निरंजन डावखरे तसेच ठाणे शहर भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष आनंद बनकर यांच्या पुढाकाराने शिष्ट मंडळासोबत आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक पार पडली.

दिव्यांगांना उदरनिर्वाहाबरोबर त्यांच्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दितील दिव्यांगांकरिता बीएसयूपी अंतर्गत घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोना काळात घरे देण्यास विलंब झाला असून सर्व घरे लवकरच दिव्यांग बांधवाना देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी, त्यांना सामाजिकदृष्ट्या सामावून घेण्यासाठी व त्यांची भावनिक उन्नत्ती होण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून यापुढे देखील दिव्यांग बांधवांचे सर्वच प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी दिली.