Municipal Corporation to implement CM City Road Scheme in Thane It will help in developing undeveloped roads

वेबिनार महासभेचा फटका ठाण्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना बसत असल्याने ही ऑनलाईन महासभा(online meeting) आता नकोच अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे येणारी पुढील महासभा ही प्रत्यक्ष घ्यावी,अशी मागणी महिला तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे.

ठाणे : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभा या वेबिनारद्वारे आयोजित करण्यात येत आहेत. मात्र वेबिनारद्वारे होणाऱ्या महासभेत प्रचंड गोंधळ(chaos in thane corporation online meeting) पाहायला मिळत आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणाचा आवाज ऐकू येत नाही,तर काहींना कोण काय बोलत आहेत हेच समजून येत नाही. त्यामुळे या वेबिनार महासभेचा फटका ठाण्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना बसत असल्याने ही ऑनलाईन महासभा(online meeting) आता नकोच अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे येणारी पुढील महासभा ही प्रत्यक्ष घ्यावी,अशी मागणी महिला तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे.

ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच प्रभागातील विविध कामांचा चर्चेच्या हेतून सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येते. मतदार आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून पाठवत असतात. सर्व सामान्य जनतेचा आवाज म्हणून महासभेत नगरसेवक आपली भूमिका स्पष्ट करत असताना, मात्र प्रत्यक्ष न होणाऱ्या सभेमुळे हवी तशी चर्चा होत नाही. आपल्या विभागातले प्रश्न, समस्या, अडीअडचणी नगरसेवकांना प्रशासनासमोर मांडता येत नाही. महिलांना तर यामध्ये काही बोलता येत नसून प्रामुख्याने या ऑनलाईन महासभेचा तोटा महिला नगरसेवकांना होत असल्याचे महिला नगरसेवकांनी यावेळी बोलताना सांगितले.

लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळाचे अधिवेशन प्रत्यक्ष पार पडले. मग महापालिकेच्या महासभा या वेबिनारवर का असा सवाल विरोधकांनी यापूर्वी आवाज उठवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेससह सत्ताधारी शिवसेनेनेदेखील राज्य शासनाला पत्र पत्रव्यवहार केला होता. दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर शासनाने स्थायी समितीच्या बैठका तसेच वैधानिक सभा या प्रत्यक्ष घ्याव्यात असे अध्यादेश काढले होते. मात्र ठाणे महापलिकेची खंडित महासभा वेबिनारवर मंगळवारी संपन्न झाली त्यामध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.

ऑनलाईन महासभेत मोजक्याच नगरसेवकांचा ‘माईक ऑन’

कोरोना काळात आतापर्यंत अनेक महासभा वेबिनार वर पार पडल्या. यामध्ये सुरवातीच्या काळात अनेकांचे माईक बंद करण्यात आले होते. तर मोजक्याच नगरसेवकांचा ‘माईक ऑन’ करण्यात येतो असा आरोप एका ज्येष्ठ महिला नगरसेविकेने नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे.

ऑनलाईन महासभेमुळे प्रश्न मांडण्यात अडचण

घरी बसल्या आपल्या विभागातल्या समस्या, अडचणी वेबिनारद्वारे प्रशासनाला सांगाव्या लागत आहेत. यामध्ये अनेक अडचणी येत असल्याने प्रश्न मांडताच येत नाहीत.

तांत्रिक बिघाडामुळे नगरसेवकांच्या तोंडून येणारे वाक्य

हॅलो.. हॅलो…माईक टेस्ट…, आवाज कमी करा….., आवाज ऐकू येतोय का…., थांबा जरा ज्येष्ठ नगरसेवक बोलत आहेत…., थोडं समजून घ्या….