ठराविक नगरसेवकांची दिवाळी अन् बाकीच्यांचा शिमगा, ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती खरंच वाईट आहे का? भाजपच्या नगरसेविकेचा सवाल

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर(Thane budget) महासभेत चर्चा करण्यात आली. स्थायी समिती समितीने मंजुर केलेल्या अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांना(corporators fund) झुकते माप देण्यात आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, असे असतांना नव्या प्रकल्पांसाठी निधी कशासाठी, थिमपार्क, बॉलीवुड पार्क आदींसाठी पुन्हा ३० कोटींची तरतूद कशासाठी असा सवालही यावेळी भाजपच्या(BJP) नगरसेवकांनी उपस्थित केला.

    ठाणे: एकिकडे कोरोनामुळे(corona) आर्थिक स्थिती खालावली असल्याचे ठाणे पालिकेकडून(thane corporation) सांगितले जाते तर दुसरीकडे अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांनाच १०० आणि १५० कोटीचा निधी(development fund to corporators) दिला जात असेल तर इतर नगरसेवकांच्या प्रभागात कामे कशी होणार ? असा सवाल भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी अर्थसंकल्पीय महासभेत उपस्थित केला. मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्याऐवजी जी अत्यावश्यक आणि महत्वाची कामे असतील त्यासाठी निधी देणे अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महासभेत चर्चा करण्यात आली. स्थायी समिती समितीने मंजुर केलेल्या अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांना झुकते माप देण्यात आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, असे असतांना नव्या प्रकल्पांसाठी निधी कशासाठी, थिमपार्क, बॉलीवुड पार्क आदींसाठी पुन्हा ३० कोटींची तरतूद कशासाठी असा सवालही यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. आधीच्याच प्रकल्पांची अवस्था काय आहे, हे समस्त ठाणेकरांना माहित आहे. असे असतांना पुन्हा अशा प्रकल्पांसाठी निधी का द्यायचा असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

    ठाणे शहर हे तलावांचे आणि उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जाते, परंतु उद्यानांसाठी पालिकेकडे निधीच नसतो, मात्र अशा चुकीच्या आणि खर्चीक प्रकल्पांसाठी निधी कसा दिला जातो, आणि तो देखील काही ठराविक नगरसेवकांच्या हट्टापाई कशासाठी हा निधी खर्च करायचा असा सवालही यावेळी मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला. दादोजी कोंडदेव क्रिडागृह असेल किंवा शरदचंद्र पवार स्टेडीअम यावर दरवर्षी कोटय़ावधींचा खर्च केला जात आहे. परंतु ठाण्यातील किती खेळाडू तयार झाले, दादोजी कोंडदेव क्रिडागृहाचा वापर खेळांडूसाठी होतो का? केवळ आयपीएलच्या जाहीरात करण्यासाठी हायमास्कचा अट्टाहास केला जात असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली. नगरसेवकांनी केवळ पाणी, रस्ते, गटार, पायवाटा अशा मुलभुत समस्या सोडविण्यासाठीच भांडणो करत राहायची का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे निधी द्यायचाच असेल तर सर्वाना समान तत्वानुसार देण्याची मागणी त्यांनी केली.

    ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी हवीच

    सत्ताधारी शिवसेनेने मागील महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस ठाणेकरांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु कदाचित आता त्यांना याचा विसर पडला असेल, तरी देखील आम्ही त्याची आठवण करुन देऊ आणि ठाणेकरांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी देखील मृणाल पेंडसे यांनी केली.