corona patients

ठाणे : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या

 ठाणे : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी इक्बाल चहल यांच्याकडे मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता ठाणे जिह्यातील काही महापालिकेतील आयुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. उल्हासनगर, पनवेल, ठाणे येथे करोनाचे संकट गडद होत असताना स्थिती हाताळण्यात प्रशासन निकामी ठरत असल्याने या बदल्या केल्या गेल्याचे बोलले जात आहे.

कोणाची कुठे झाली बदली?

– पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली

– उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली

– समीर उन्हाळे यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरून उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी बदली

– संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली