murder

जमील हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ठाणे पोलिसांच्या तीन टीम उत्तरप्रदेशात शूटरचा शोध(thane police in uttar pradesh to search murderer) घेत आहेत.

ठाणे : सोमवारी राबोडीच्या रहदारीच्या रस्त्यावर गोळीबार करीत आरटीआय कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या(jameel sheikh murder) करून पोबारा करणाऱ्या आरोपींचा बायोडाटा ठाणे पोलिसांच्या हाती पडला आहे. या प्रकरणात आरोपींना गाडी पुरविणारा आणि इच्छितस्थळी पोहचविणारा आरोपी शाहिद शेख याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि जमील हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ठाणे पोलिसांच्या तीन टीम उत्तरप्रदेशात शूटरचा शोध(thane police in uttar pradesh to search murderer) घेत आहेत.

जमील शेख याच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. तर हत्येचे गूढ वाढले होते. विविध चर्चांना ठाण्यात ऊत आला होता. तर ठाणे पोलीस मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान गुरुवारी जमील हत्या प्रकरणात शाहिद शेख याला ठाणे पोलिसांनी अटक केली. अन जमील हत्याकांडाचा खुलासा होत गेला. अटक शाहिद शेख याने आरोपींना सोडण्यासाठी मदत केली. तसेच दुचाकीही पुरविल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या चौकशीत जमीलची हत्या करणारे आरोपी हे उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांच्या तीन टीम या यूपीत दाखल झाल्यसून शुटर आरोपींचा शोध घेत आहेत.

तीन पथके उत्तरप्रदेशात
ठाणे पोलिसांची तीन पथके उत्तरप्रदेशात पोहचली आहे. यात गुन्हे शाखा , खंडणी विरोधी पथक, आणि राबोडी पोलिसांचे एक पथक उत्तरप्रदेशात दाखल झाले आहेत. अटक आरोपीच्या माहितीवरून शुटर हे यूपीतील असल्याने पोलीस पथके रवाना झाली. पोलीस सीसीटीव्ही मधील चलचित्र याचा आसरा घेऊन आरोपींचा शोध घेत आहेत. अटक आरोपीच्या चौकशीत हळूहळू हत्येचे रहस्य उलगडत चालले आहे. अन आता जमील याच्या हत्येमागच्या कारणाने वळण घेतले आहे.

जमीलच्या हत्येतील शूटरचा कट्टे विकण्याचा धंदा ?
जमीलच्या हत्येत सहभागी असलेले दोन आरोपी यांचा गावठी कट्टा विकण्याचा धंदा असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. उत्तरप्रदेशातून ठाण्यात येऊन हत्या केल्याने हि हत्या वैमनस्येतून कि हत्येची सुपारी याबाबत रहस्य वाढले आहे. जमील याच्या हत्येमागे नेमके कारण काय? याचा खुलासा आता प्रत्यक्षात हत्या करणाऱ्या आरोपीच्या अटकेनंतर चौकशीतून समोर येणार आहे.