thane-rain-update-heavy-rainfall-affects-life-in-thane-district nrkk | LIVE update :ठाणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, जनजीवन विस्कळीत | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट6 दिन पहले

LIVE update :ठाणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, जनजीवन विस्कळीत

ऑटो अपडेट
द्वारा- Kaustubh Khatu
15:20 PMJul 19, 2021

कोकण रेल्वे विस्कळीत, बोगद्यात शिरले पाणी

कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीत व्यत्यय

गोव्यातील करमाळी आणि थिव्हिम स्टेशन दरम्यान जुना गोवा बोगदा येथे सतत मुसळधार पाऊस पडल्याने आणि पाणी शिरले.

वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या वळविण्यात आल्या आहेत.


 

15:05 PMJul 19, 2021

रत्नागिरीत घरांची पडझड

आज सकाळी मौजे कादीवली येथील शंकर गायकर यांचा गोठा पडून नुकसान झाले

मौजे माळवी येथील सुनील शंकर शिगवण यांच्या घराची भिंत पडून अंशतः नुकसान झाले आहे.

दापोली तालुक्यातील सालदुरे भंडार वाडा येथील सुरेश सुडकोजी खेडेकर यांचे घराचे अंशतः नुकसान झाले आहे

13:58 PMJul 19, 2021

दरड कोसळली

राजपुरी येथे दरड कोसळून ३ ते ४ घरांचे नुकसान झाले आहे. एकूण ५ कुटूंबातील २४ व्यक्तीनां सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जीवित हानी नाही.

 

13:55 PMJul 19, 2021

रायगड

माथेरान मध्ये जोरदार पाऊस 

दोन तासांपासून वीजपुरवठा बंद

बाळगंगा नदीला पूर

13:52 PMJul 19, 2021

पेण तालुक्यातील रावे आणि साई गाव येथे पूरसदृश्य परिस्थिती

पेण तालुक्यातील जोहे , कळवे, तांबडशेत, हमरापूर, विभागातील गणपती कारखान्यांतील नुकसान.

पेण तालुक्यातील खाडी पट्याला लागुन असलेल्या सखल भागात पाणि भरले असुन अनेक गावात पाणि शिरले.

13:39 PMJul 19, 2021

वेल प्लॅन सिटी तुंबली

पनवेल परिसर जलमय

विविध ठिकाणी पाणी तुंबले

ओएनजीसी येथे मुंबई पुणे महामार्गावरील गटारे बूजवून तिथे अतिक्रमण झाल्याने या परिसरातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे.

13:20 PMJul 19, 2021

रस्ता खचला

सतत पडणाऱ्या पावसामुळे टिटवाळा, अंबिवली, बल्याणी परिसरात सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचारा होत नसल्याने मुख्य रस्ता खचला आहे. रस्त्याच्या मध्यभागी साधारणपणे ७ ते ८ फुट गॅप पडला असल्याची घटना रविवारी रात्री १च्या सुमारास घडली.

दरम्यान, प्रभाग क्षेत्र आधिकारी "अ" प्रभागक्षेत्र यांनी घटनास्थळी पोहचत भागाची पाहाणी केली आहे. जे सी.बीच्या साहयाने नवीन सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू केले.

12:50 PMJul 19, 2021

मुबईत रेड अलर्ट

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट

कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

12:45 PMJul 19, 2021

आता कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू

बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची सध्या फक्त कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू आहे. पण आता पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. 

12:37 PMJul 19, 2021

बदलापूर रेल्वे स्थानक जलमय

बदलापूर रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचायला सुरुवात

 

पावसाचा जोर कायम असल्यानं रेल्वेसेवा ठप्प होण्याची भीती

 

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पंप लावून पाणी काढण्याचे प्रयत्न

Load More

जोरदार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाणे शहरात मोर्चा वळवल्याने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे ठाणे महापालिका मुख्यालयाजवळील रस्त्यासोबतच ठाण्याच्या सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठाण्याच्या भास्कर कॉलनी, चिखलवाडी, तबेला, भांजेवाडी भाग पूर्णपणे जलमय झाला होता. येथील घरांमध्ये पाणी साचल्याने त्यामध्ये अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी टीडीआरएफच्या पथकाला मध्यरात्रीच्या सुमारास बचाव मोहीम राबवण्याची वेळ आली. तर, नौपाड्यातील सखल भागांतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. दादोजी कोंडदेव क्रीडा स्टेडिअमची संरक्षण भिंत आणि झाड कोसळल्याने येथे उभ्या असलेल्या महापालिकेच्या तीन गाड्यांचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

गेल्या तासाभरात ४२ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून उपनगरीय वाहतुकीचे वेळापत्रक पूर्ण पणे कोलमडले. तर ठाणे शहरात एक वाहून गेला असून दोन कंपाऊंडच्या भिंती पडल्या. तर काही झाडे, फोरव्हीलर व दुचाक वाहनांवर उन्मळून पडले. खोपट बस डेपोसह अन्यही ठिकाणी शहरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ रविवार
रविवार, जुलै २५, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.