ठाणे जिल्ह्यातील केश कर्तनालयाची दुकाने सुरु करण्याची नाभिक समाजाची मागणी

भिवंडी: लॉकडाऊन संपून अनलॉक सुरू झाल्याने गेल्या अडीच महिन्यापासून नाभिक समाजाच्या बांधवांचे केश कर्तनालयची दुकाने बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून ही दुकाने सुरू करण्यासाठी महाराष्ट्र

भिवंडी: लॉकडाऊन संपून अनलॉक सुरू झाल्याने गेल्या अडीच महिन्यापासून नाभिक समाजाच्या बांधवांचे केश कर्तनालयची दुकाने बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून ही दुकाने सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडल उपाध्यक्ष ठाणे जिल्हा रत्नाकर जाधव यांनी नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले. राष्ट्रीय नाभिक सेनेने आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन आपल्या नंतर बहुतांशी उद्योगधंदे सुरू झाले असून सलून व्यवयान बंद आहे. त्यामुळे घरभाडे ,घरखर्च,दुकानभाडे,लाईट बिल, मुलांच्या शिक्षणाचे खर्च, या सगळ्यासाठी पैसे उभे करण्याची समस्या आहे.  दुकान बंद असल्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.