नवीन वर्षात ठाणेकरांची ‘या’ मोठ्या समस्येतून होणार सुटका

घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) ब्रह्मांड परिसरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा ( water supply)  ब्रह्मांड (Brahmand)n परिसरासाठी नियमित करावा, त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्या देखील तातडीने दूर करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

ठाणे : नवीन वर्षात ठाणेकरांची (Thane) त्यांना भेडसावत असलेल्या एका मोठ्या समस्येतून सुटका होणार आहे. ठाण्यातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी आता खुद्द महापौरांनी पुढाकार घेतला आहे. घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) ब्रह्मांड परिसरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा ( water supply)  ब्रह्मांड (Brahmand)n परिसरासाठी नियमित करावा, त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्या देखील तातडीने दूर करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

ब्रह्मांड परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज येथील रहिवाशांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, शाखाप्रमुख महेंद्र मढवी, दीपक साळवी, महेंद्र देशमुख, समीर मेहता, उपशाखाप्रमुख तानाजी राऊत, रवि सरवणकर, निखिल ठोंबरे, दर्शन मोहिते आदींनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेवून निवेदन दिले. महापौरांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांच्याशी बैठक घेवून पाणीपुरवठा नियमित करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये सद्यपरिस्थितीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून नियमित दोन तासांचा पाणी पुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन ब्रह्मांडवासियांनी महापौरांना दिले. यावेळी कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी देखील ब्रह्मांड परिसराला कमी दाबाने होतअसलेल्या पाणीपुरवठ्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच लॉकडाऊन मध्ये या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम बंद होते, परंतु ते काम आता सुरू करण्यात येणार असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल असेही यावेळी सांगितले.