‘त्या’ १०६ वर्षीय महिलेेने केली ७ दिवसांत कोरोनावर मात

दत्ता बाठे, कल्याण : सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, मनपा कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांच्या टीमने १०६ वर्षीय महिलेवर(106 year old woman) कोरोना उपचार करीत तिला कोरोनामुक्त(corona free)) केले आहे. डोंबिवली पश्चिमेतील आनंदीबाई पाटील या १०६ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. मात्र डोंबिवली(dombivali) येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, मनपा कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना १३ सप्टेंबर रोजी दाखल करून घेतले. आज  उपचाराअंती आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून अवघ्या सात दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना १०६ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने ७ दिवसांमध्ये कोरोनावर मात करणे नक्कीच दिलासादायक आहे.
पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनाला न घाबरता लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करीत निदान करून योग्य वेळी रूग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात करता येते, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचे लवकर निदान झाल्यास उपाचाराअंती कोरोनावर मात करता येते हे या १०६ वर्षीय वृद्ध महिलेने दाखवून दिले आहे.