bhivandi parol highway

भिवंडी: भिवंडी- पारोल महामार्गावरील(bhivandi parol highway) नदिनाका ते खोणी(nadinaka to khoni) या दरम्यान रात्री सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र निष्कृष्ट काम व निष्काळजीपणामुळे हा रस्ता धुवून जाऊन संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे . त्यामुळे बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार(corruption) उघड झाला आहे.

शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नादिनाका ते खोणी गावापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता दोन वर्षांपूर्वी बनविण्यात आला होता. मात्र त्याच रस्त्यावर पुन्हा सहा इंचाचा सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्याचे काम ठेकेदारामर्फत सुरू आहे. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा मुलामा देऊन रस्त्याच्या समोरील बाजूस सर्वेक्षणासाठी बॅरीकेट्स व सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे बनविलेल्या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल दिसून आला. रात्रीच तयार करण्यात आलेला हा रस्ता बारा ताससुद्धा टिकू शकला नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.