डोंबिवलीतील कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे काम ८ जूनपूर्वी करण्याचा प्रशासनाचा मानस

कल्याण :- कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता डोंबिवली येथील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त

 कल्याण :- कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता डोंबिवली येथील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलात डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय महापौर सौ विनिता राणे आणि महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. सदर ठिकाणी आवश्यक कामाला सुरुवात करण्यात आली असून या ठिकाणी एकूण २०० बेड्सचे ऑक्सिजन सुविधासह कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येईल. येथील सर्व बेड्सना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असेल. तसेच १० बेड्सला गंभीर रुग्णासाठी सेमी आय.सी.यु. तयार करण्यात येतील.

सदर काम  ८ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. आज सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बंदिस्त क्रीडा संकुलाला भेट देऊन चालू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्ली), आय .एम.आय . कल्याण चे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील,विषाणू प्रतिबंधक तज्ञ डॉ. सुप्रिया अमेय व इतर अधिकारी उपस्थित होते.