The bodies of three children, including a mother, were found rotting on a tree, missing for two months

श्रीपती यांनी पडघा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर रोजी पत्निसह तीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी दुपारी श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता त्याला एका झाडाकडून दुर्गंन्धी येत होती.

भिवंडी : भिवंडीतील (Bhivandi) पडघ्यामध्ये आईसह (mother) तीन मुलांचे मृतदेह (bodies of three children) झाडाला लटकेल्या अवस्थेत आढळले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपासून आईसह तीन मुले बेपत्ता (missing for two months) होती. अखेर दोन महिन्यांनंतर या चारही जणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत झाडावर लटकले होते. पत्नी आणि तीन्ही मुलांचे मृतदेह अशा अवस्थेत पाहून वडिलांनी देखील विष घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल केले आहे.

मयत महिलेचे नाव रंजना(३०), मुलगी दर्शना (१२), रोहिणी(६) तर मुलगा रोहित (९) आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याचे नाव श्रीपती बच्चू असे आहे. श्रीपती यांनी पडघा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर रोजी पत्निसह तीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी दुपारी श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता त्याला एका झाडाकडून दुर्गंन्धी येत होती. म्हणून तो त्या झाडाकडे सरसावला असता. त्याला चारही मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसले. मृतदेहांच्या कपड्यावरुन ओळख पटली असल्यामुळे भावाने श्रीपतीला याबाबत माहिती दिली. यानंतर श्रीपतीनेही स्वतः विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने जे जे रुग्णालयात त्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ठाणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. मागील दोन महिन्यांपासून मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वीही भिवंडीमध्ये तीन युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात या तिघांनी तंत्रमंत्र शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केली असल्याचे समजले होते. परंतु पुन्हा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.