प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा सुरू ठेवली आहे. दंडात्मक कारवाईत शनिवारी तब्बल ७२ व्यक्तींकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथकांनी पोलीसांच्‍या सहकार्याने, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणा-या व्यक्तिंविरुध्द दंडाची कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे.

कल्याण (Kalyan).  कोरोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा सुरू ठेवली आहे. दंडात्मक कारवाईत शनिवारी तब्बल ७२ व्यक्तींकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथकांनी पोलीसांच्‍या सहकार्याने, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणा-या व्यक्तिंविरुध्द दंडाची कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे.

काल दिवसभरात मास्क परिधान न केलेल्या व्यक्तींकडून प्रभाग निहाय ….
अ प्रभागक्षेत्रातून रुपये १ हजार
ब प्रभागक्षेत्रातून रुपये ५हजार ५००
क प्रभागक्षेत्रातून रुपये १३हजार
जे प्रभागक्षेत्रातून रुपये २ हजार /-,
ह प्रभागक्षेत्रातून रुपये २हजार ५००
ग प्रभागक्षेत्रातून रुपये १ हजार
आय प्रभागक्षेत्रातून रुपये ३ हजार ५००
ई प्रभागक्षेत्रातून रुपये ७ हजार ५००

एकूण ७२ नागरिकांकडून रक्कम रुपये ३६ हजार इतका दंड वसूल करण्‍यात आला. कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्‍या चेह-यावर मास्‍क किंवा कापड न चुकता परिधान करावे , असे आवाहन महापालिकेमार्फत करण्‍यात येत आहे.