bhivandi building accident

ठाणे : भिवंडी (Bhiwandi ) येथील तीन मजली इमारत कोसळल्यामुळे (building accident) आणखी आठ जणांचे मृतदेह सापडल्यानंतर बुधवारी मृतांची (death ) संख्या ४० वर पोचली. मृतांमध्ये १५ मुलांचा  (15-year-old children) समावेश असून दोन ते १५ वर्षे वयोगटातील मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत २५ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहे. या लोकांना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुसळधार पाऊस असूनही रात्री शोध मोहीम सुरूच होती. ते म्हणाले की, मलब्यातून काढलेल्या मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत कारण ते ५० तासांपेक्षा जास्त काळ मलब्यात होते. सोमवारी पहाटे ३.४० ​​वाजता ४३ वर्षांची ‘जिलानी बिल्डिंग’ कोसळल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या इमारतीत ४० फ्लॅट होते आणि येथे सुमारे १५० लोक राहत होते. भिवंडी हे ठाण्यापासून दहा कि.मी. अंतरावर आहे. ते म्हणाले की, इमारत कोसळल्याच्या प्रकरणात पालिकेच्या दोन अधिका्यांना निलंबित करण्यात आले असून इमारतीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी दि २३/०९/ २०२० सकाळी ०८:२३ वाजेपर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
१२) आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
१३) आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)
१४)अब्दुला शेख(पु/८वर्ष)
१५) मुस्कान शेख(स्री/१७वर्ष)
१६) नसरा शेख(स्त्री/१७वर्ष)
१७) इंब्राहिम(पु/५५वर्ष)
१८)खालिद खान(पु/४० वर्ष)
१९) शबाना शेख(स्त्री/५०वर्ष)
२०) जारीना अन्सारी (स्त्री/४५)
२१)मोबिन शेख़ (पु/४६ वर्ष)
२२)सायमा इब्राहिन शेख़ (पु/१७ स्त्री)
२३)आयाम इब्राहिन शेख़ (पु/७ वर्ष)
२४)रूक्सा सलमानी (स्त्री/२० वर्ष)
२५)उक्सा सलमानी (स्त्री/०४वर्ष)

जखमी क्र.२१ते २५ शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापुर्वी असल्याने अध्यायवत करण्यात आली आहेत.


मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे :

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)
११) नाजो अन्सारी (स्त्री/२६)
१२) सनी मुल्ला शेख (पु/७५)
१३) अस्लम अन्सारी (पु/३०)
१४)नजमा मुराद अन्सारी (स्त्री/५२वर्ष)
१५)अफसाना अन्सारी (स्त्री/१५वर्ष)
१६)अमान ईब्राहिम शेख (पु/२२वर्ष)
१७)शाहिद अब्दुला खान (स्त्री/३२वर्ष)
१८)असद शाहिद खान ( पु/२.५वर्ष)
१९) नरीमा अरीफ शेख (स्त्री/२५वर्ष)
२०) आरीफ युसुफ शेख (पु/३०वर्ष)
२१) निधा आरिफ़ शेख़। (स्त्री/१० वर्ष)
२२) शबनम मोहम्मद आलीशेख़ (स्त्री/८ वर्ष)
२३) सोएफ युसुफ़ शेख़(पु/२२ वर्ष)
२४) साक़िर आली अन्सारी ( पु/३२ वर्ष)
२५) हासनेल शेख. (पु/ ३ वर्ष)
२६)अन्सारी मुदस्सीर मोहम्मद हनिफ .(पु/२५वर्ष)
२७)फरिदा मुर्तिजा खान (स्त्री/३२वर्ष )
२८)आरीफा उर्फ उंडो मुर्तिजा खान (स्त्री/०३वर्ष )
२९)अनोळखी (पु/०६वर्ष )
३०)अनोळखी (पु/२.५ वर्ष )
३१)अनोळखी (पु/४५ वर्ष )
३२)मोमीना समिउल्ला शेख ( स्त्री/६७ वर्षे )
३३)परवीन शब्बीर कुरेशी —( स्त्री/ २७वर्षे )
३४)मरीयम शब्बीर कुरेशी (स्त्री / ४ वर्षे )
३५) फरीदा बानो मुर्तुजा खान ( स्त्री/३२ वर्ष)

धामणकर नाकाजवळील नरपोली येथील ‘पटेल कंपाऊंड’ येथे असलेली इमारत कोसळली तेव्हा तेथील रहिवासी झोपले होते. त्यांनी सांगितले की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ) आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद बल (टीडीआरएफ) चे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत आणि शोधमोहीम सुरू आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या जीर्ण इमारतींच्या यादीमध्ये या इमारतीचा समावेश नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान राज्याचे वस्त्रोद्योग तथा मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीला भेट देऊन या दुर्घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या शहरांची लोकसंख्या वाढली आहे त्या ठिकाणी अशा धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत असल्याने या धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे पुनर्वसन कसे करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भिवंडीतील पुनर्वसनाच्या मुद्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून अजून काही मदत हवी असल्यास ती देखील पूरवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.