तीन चिमुकल्या मुलांची हत्या करून पित्यानं स्वतःला ही संपवलं

  • पत्नी घर सोडून गेल्याच्या नैराश्याने पतीने तीन मुलांची हत्या करुन स्वत: घातपात केल्याची घटना नालासोपारामध्ये घडली आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका व्यक्तीनं आपल्या तीन लहान चिमुकल्या मुलांची हत्या करून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मयत कैलास परमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन परिसरातल्या बाबूल पाडा इथं कैलास परमार हा व्यक्ती राहत होता. शनिवारी रात्रीच्या ७ ते ८ वाजताच्या सुमारास त्यानं त्याच्या २ मुली आणि १ मुलगा अशा तीन मुलांची चाकूनं गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली. आणि नंतर स्वत:वर देखील चाकूनं वार करून आत्महत्या केली. 

त्यांचा लसूण विक्रीचा धंदा होता. कैलास परमार हा तीन मुलांचा सांभाळ करायचा. आणि त्याची पत्नी लसूण विक्रीचा धंदा करायची. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून गेली होती. त्या नैराश्यामुळे त्यांनी हा घातपात करून स्वतःला संपवलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं आहे. मात्र यामागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक कारण आहे का त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 

तर फेसबुक वर त्यानं त्याच्या पत्नीचा फोटो दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवर पाहिल्या नंतर त्यानं हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तुळींज पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून ४ ही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलेत.