प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात ८ महिन्यांपासून फरारी आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

बर्फ फोडण्याच्या टोचणे प्राणघातक हल्ला (Attack) करून आरोपी तौसिफ़ अश्रफ इनामदार(२७) हा मुंबई पोलिसांना (Mumbai Police) गुंगारा देत होता. सदर फरारी  आरोपी (Accused) हा ठाण्याच्या मुसरोड येथे आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा (Crime Branch)  युनिट-१ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

ठाणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तक्रारदार फिर्यादी जावेद (Javed) याच्यावर ब्लेड आणि बर्फ फोडण्याच्या टोचणे प्राणघातक हल्ला (Attack) करून आरोपी तौसिफ़ अश्रफ इनामदार(२७) हा मुंबई पोलिसांना (Mumbai Police) गुंगारा देत होता. सदर फरारी  आरोपी (Accused) हा ठाण्याच्या मुसरोड येथे आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा (Crime Branch)  युनिट-१ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पुढील तपासासाठी भांडुप पोलीस(Bhandup Police) ठाण्याचं स्वाधीन करण्यात आले.

फिर्यादी जावेद याच्यावर २ फेब्रुवारी,२०२० रोजी आरोपी आवेझ इनामदार, फिरोज उर्फ चिकन, नबिराजन कोणार आणि तौसिफ़ इनामदार यांनी हल्ला केला. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील लाजीज हॉटेल भांडुप येथे जावेद आणि चार आरोपींसोबत भांडणे झाली होती. त्याचाच राग काढीत चौघांनी जावेद याच्यावर २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर ब्लेड आणि टोचाच्या सहाय्याने हल्ला केला. यात जावेद गंभीर जखमी झाला.

चार आरोपींच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात भादंवि ३०७,३२४,३२३,५०४,५०६(२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी तौसिफ़ अश्रफ इनामदार हा फरारी होता. तर आठ महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सादर आरोपी हा मूस चौक स्टेशन रोड येथे येणार असलायची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस नाईक अमोल देसाई याना मिळाली त्यानुसार सापाला रचून पोलीस पथकाने भांडुप पोलीस ठाण्यातून फरारी असलेल्या इनामदार याला बेड्या ठोकून त्याला भांडुप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.