कल्याण डोंबिवलीत कोरोन रुग्णांचा उच्चांक ; एकाच दिवशी ४८ नवीन रुग्णांची वाढ

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू ; कोरोना रुग्णांची संख्या ६४२ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुगांच्या संख्येने उच्चांक गाठला असून मागील २४ तासात तब्बल ४८ नवीन रुग्णांची भर पडली

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू ; कोरोना रुग्णांची संख्या ६४२

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुगांच्या संख्येने उच्चांक गाठला असून मागील २४ तासात तब्बल ४८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनामुळे २  जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ४८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या   ६४२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून २४२  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३८२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या ४८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १५, कल्याण पश्चिमेतील १३, डोंबिवली पूर्वेतील ९, डोंबिवली पश्चिमेतील ८,  टिटवाळा  २, तर शहाड येथील १ रुग्णाचा समावेश आहे. तर आज झालेल्या  दोन मृत्यूपैकी आंबिवली येथील ७५ वर्षीय पुरुषाचा आणि डोंबिवली पश्चिमेतील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये २४ पुरुष, १८ महिला, १ बालिका तर ५ मुलांचा समावेश आहे.

आज आढळलेले हे रुग्ण कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी, विठ्ठलवाडी, आनंदवाडी, श्रीराम कॉलनी, नांदिवली, तिसगाव, कोळसेवाडी, जरीमरी मंदिरा जवळ, लोकधारा,  कल्याण पश्चिमेतील जोकर सिनेमा जवळ, गोविंदवाडी, कपोते नगर, ठाणकर पाडा, संतोषी माता रोड, आधारवाडी, डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा, विठ्ठल मंदिर रोड, तुकाराम नगर, आजदेगाव, डी.एन.सी. रोड, दावडी, डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड, कोपरगाव, आनंद नगर, कर्वे रोड, गणेश नगर, उमेश नगर, शहाड रेल्वे स्टेशन जवळ, टिटवाळा पूर्वेतील राज वैभव पार्क, उमिया कॉम्प्लेक्स या परिसरातील आहेत.