ठाण्यातील कोरोनामुक्त रूग्णांच्या संख्येत उच्चांक

ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील रिकव्हरी रेट वाढला असून शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के झाले आहे. परंतु ठाण्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वत्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. परंतु राज्यांतील काही भागांत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील रिकव्हरी रेट वाढला असून शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के झाले आहे. परंतु ठाण्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील रिकव्हरी रेट –  

ठाणे मनपा क्षेत्रात ८९ टक्के , नवी मुंबईतील मनपा क्षेत्रात ८२ टक्के , कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ८५ टक्के, पुणे मनपा क्षेत्रात ७८ टक्के, मुंबई मनपा क्षेत्रात ८१ टक्के ,महाराष्ट्र राज्यात ७१ टक्के, दिल्लीमध्ये ९० टक्के

ठाणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या २३ हजार ८४३ इतकी झाली आहे. यामध्ये जवळपास ७६४ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २१ हजार १३९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, १ हजार ९४० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जून महिन्यामध्ये ठाण्यात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होता. शहरातील दाट वस्त्यांमध्ये कोरोना संक्रमण पसरल्याने चिंता व्यक्त केली जात होती. परंतु  शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुन्य कोव्हीड मोहीम हाती घेतली. त्यामुळे जुलै महिन्यापासून शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २०० पेक्षाही कमी झाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनपा प्रशासन यांच्या उपाय-योजनेमुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.