वऱ्हाळा निवासासमोर पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या पुड्या (भिवंडी)
वऱ्हाळा निवासासमोर पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या पुड्या (भिवंडी)

भिवंडी (Bhivandi) :  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांची दुरवस्था झालेली असताना वऱ्हाळ तलावाशेजारी वऱ्हाळा निवास हे महानगरपालिका आयुक्त यांचे निवासस्थान आहे. त्या समोरील तलावानजीक बनविण्यात आलेल्या जॉगर्स ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नव्हे तर आता मद्यपींसाठी सोयीस्कर बनली आहे.

भिवंडी (Bhivandi) :  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांची दुरवस्था झालेली असताना वऱ्हाळ तलावाशेजारी वऱ्हाळा निवास हे महानगरपालिका आयुक्त यांचे निवासस्थान आहे. त्या समोरील तलावानजीक बनविण्यात आलेल्या जॉगर्स ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नव्हे तर आता मद्यपींसाठी सोयीस्कर बनली आहे. रात्री या ठिकाणी असंख्य मद्यपी मद्याचे घोट रिचवत असल्याने सध्या या ठिकाणी रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या प्लेटींचा खच पडलेला दिसून येत आहे.

२००७ च्या सुमारास तब्बल १७ कोटी खर्च करून वऱ्हाळ तलाव संवर्धन व सुशोभीकरण करण्यात आले. त्यामध्ये या जॉगर्स ट्रॅकची बांधणी करण्यात आली होती; परंतु या उद्यानासह जॉगर्स ट्रॅककडे महानगरपालिका प्रशासन ,लोकप्रतिनिधी व उद्यान विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केला आहे. या जॉगर्स ट्रॅक ठिकाणी तर या तलावा शेजारील संरक्षक कट्टा ही बऱ्याच ठिकाणी कोसळल्याने हा जॉगर्स ट्रॅक धोकादायक ठरला आहे.  हे दुर्दैव,  परंतु या जॉगर्स ट्रॅक समोरच महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान असताना त्यांच्या डोळ्यांनाही या जॉगर्स ट्रॅक ची दुरवस्था दिसत नाही याचे नवल वाटणे साहजिकच आहे.