दहाव्या दिवशीही एनआरसी कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच ; पाण्याच्या लाईन खंडित केल्याचा व्हिडिओ वायरल

कामगारांनी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास पोलिसांमार्फत दडपशाही करण्याचा प्रकार घडत आसल्याचा आरोप आंदोलनकर्ते कामगार करत असून सोमवारी कामगार वसाहतीतील आरएस परिसरात बिल्डिंग पाडकाम करीत असताना पाण्याच्या लाईन बाधित करण्याचा तसेच वीज लाईन सुरू असताना पाडकाम करण्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    कल्याण : मोहने येथील एन.आर.सी कामगारांचा प्रश्‍न शासन दरबारी पोहोचवा याकरिता कामगार व महिलावर्ग ठिय्या आंदोलन दहा दिवस झाले तरी सुरूच आहे. एनआरसी कॉलनीत रिकाम्या बिल्डिंग, बंगले पाडकाम आदाणीने सुरू ठेवले असल्याने जो पर्यंत कामगारांची थकित देणी मिळत नाही. तो पर्यंत कामगार आंदोलन सुरू ठेवत पाडकामास विरोध करीत आहेत.

    कामगारांनी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास पोलिसांमार्फत दडपशाही करण्याचा प्रकार घडत आसल्याचा आरोप आंदोलनकर्ते कामगार करत असून सोमवारी कामगार वसाहतीतील आरएस परिसरात बिल्डिंग पाडकाम करीत असताना पाण्याच्या लाईन बाधित करण्याचा तसेच वीज लाईन सुरू असताना पाडकाम करण्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निष्काळजीपणे पाडकाम करत असल्याने यामध्ये दुर्घटना घडून कोणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल कामगार करत असल्याचे आयटक युनियन चे कामगार प्रतिनिधी अर्जुन पाटील यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत ठोस निर्णय कामगारांच्या देण्याबाबत मिळत नाही तो पर्यंत कामगारांचे आंदोलन सुरू राहणार आहे.