corona apdate

ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवस कोरोनावर चांगले नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु काही दिवसानंतर कोरोनाने पुन्हा आपले रौद्ररुप धारण केले आहे. ठाणे शहरात ३२ हजार ४७७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात (Thane district) कोरोनाचा प्रकोप (coronavirus) पुन्हा वाढत चालाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात १७८८ कोरोना रुग्णांची नोंद (registered) झाली आहे. तर ३४ रुग्णांचा (corona patients) मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवस कोरोनावर चांगले नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु काही दिवसानंतर कोरोनाने पुन्हा आपले रौद्ररुप धारण केले आहे. ठाणे शहरात ३२ हजार ४७७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत ९२६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा

शनिवारी २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८,५७,९३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७,८६,१४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,८८,०१५ (२०.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,०१,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३९,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.