corona virus

रविवारी सापडलेल्याया  ३४० रूग्णांमुळे ( new patients)  पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,४६६ झाली आहे. यामध्ये ४२७५ रुग्ण उपचार घेत असून ३६,३७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात आज नव्या ३४० कोरोना (coronavirus)  रुग्णांची नोंद (registered) करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी सापडलेल्याया  ३४० रूग्णांमुळे ( new patients)  पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,४६६ झाली आहे. यामध्ये ४२७५ रुग्ण उपचार घेत असून ३६,३७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारच्या ३४० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६३, कल्याण प – १०५, डोंबिवली पूर्व ७५, डोंबिवली प- ७८, मांडा टिटवाळा – ४, मोहना – १४, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १३ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.