रूग्णांचा आकडा पाच हजारा पार; एका दिवसात २० रूग्णांचा मृत्यू

जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच सोमवारी कोरोना रूग्णांचाआकडा पाच हजारा पार झाल्याने चिंतेत भर पडली आहे. तर दिवसभरात २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची मृतांची संख्या ६५८१ वर पोहचली आहे. जिल्हयात सक्रीय रूग्णाांचा आकडा ४१ हजार ७४८ आहे.

    ठाणे : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच सोमवारी कोरोना रूग्णांचाआकडा पाच हजारा पार झाल्याने चिंतेत भर पडली आहे. तर दिवसभरात २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची मृतांची संख्या ६५८१ वर पोहचली आहे. जिल्हयात सक्रीय रूग्णाांचा आकडा ४१ हजार ७४८ आहे.

    ठाणे महापालिका क्षेत्रात १५८० नवीन रूग्ण आढळून आले तर ५ रूग्णांचा मृत्यू झाला सक्रीय रूग्णांचासंख्या १२ हजार ३१४ आहे. केडीएमसीत १३८१ रूग्ण सापडले असून २ रूग्णांचा मृत्यू झाला असून सक्रीय रूग्णांची संख्या १० हजार ८५५ वर पोहचली आहे. नवी मुंबईत ११३५ रूग्णांची भर पडली असून ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या सक्रीय रूग्णांची संख्या ९१५४ आहे.

    मीरा भाईदरमध्ये ३४० नवीन रूग्ण सापडले असून ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे शहरात सक्रीय रूग्णांची संख्या २९८४ आहे. उल्हासनगर क्षेत्रातही १५९ नवीन रूग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे सध्या शहरात १७५९ रूग्णांवर उपचार सुरू आहे. भिवंडीत ५३ रूग्ण सापडले असून २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या सक्रीय रूग्ण संख्या ७७५ आहे.

    अंबरनाथमध्ये २५५ रूग्णांची नेांद झाली आहे. एकही मृत्यू नाही याठिकाणी सक्रीय रूग्णांची संख्या २०६० आहे. बदलापूरमध्ये २५३ रूग्णांची नोंद झाली असून एकही मृत्यू नाही. शहरात १०६६ सक्रीय रूग्ण आहेत. ठाणे ग्रामीण परिसरात २६ रूग्ण सापडले असून ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे याठिकाणीर सक्रीय रूग्णाांचा आकडा ७८१ आहे.