कल्याण-डोंबिवलीची रुग्णसंख्या ३७ हजार पार, रिकव्हरी रेट ८४ टक्के

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मार्च अखेरपासून उपाययोजना सुरु केल्या. १ एप्रिल पासून टाटा आमंत्रा येथे सुमारे २,४३८ रुग्णांची सोय एकाच वेळेस विलगीकरण करून भव्य इमारतीत ग्रीन झोन, रेड झोन इगतवारी करून औषधे, नाश्ता, जेवण, मिनरल वॉटर आदी सुविधा रुग्णांना देऊन कोरोनामुक्त करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले.

कल्याण: क.डो.मपाने कोरोना पार्श्वभूमीवर (KDMC) सुरुवातीपासून लक्ष देत प्रभावीपणे उपाययोजना अमंलबाजवणी धोरण ठेवून कोरोना लढाई लढत आहे. कल्याण डोंबिवलीतील ( Kalyan-Dombivali has crossed 37,000) कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार पार गेली असून आतापर्यंत कोरोनामुळे ७५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्यस्थितीत कल्याण-डोंबिवलीत ५३१८ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत ३१,१७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मार्च अखेरपासून उपाययोजना सुरु केल्या. १ एप्रिल पासून टाटा आमंत्रा येथे सुमारे २,४३८ रुग्णांची सोय एकाच वेळेस विलगीकरण करून भव्य इमारतीत ग्रीन झोन, रेड झोन इगतवारी करून औषधे, नाश्ता, जेवण, मिनरल वॉटर आदी सुविधा रुग्णांना देऊन कोरोनामुक्त करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले.

पालिकेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण, फिवर क्लिनिक, आय.एम.ए.चे डॉक्टर आर्मी, फॅमिली डॉक्टर कोविड फायटर आदींच्या माध्यमातून कोरोना चाचण्यांवर भर देत कोरोना रुग्णाचे निकटसहवासित शोधून रुग्णांना वेळेवर उपचार सुविधा मिळण्याबाबत भर देत अक्शन प्लान तयार केला. पालिका क्षेत्रात धुरीकरण, फवारणी, निर्जंतुकीकरण मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात सुमारे १८ लाख लोकसंख्या असून लोकसंख्येची घनता जास्त असून ७४ झोपडपट्ट्यासह कल्याण डोंबिवली शहरी भाग तसेच ग्रामीण अ प्रभाग, २७ गावांचा समावेश आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर मृत्यू दर २.०३ टक्के असून रुग्ण दुपट्टीचा कालवधी ५२ दिवस आहे. तर रिकवरी रेट ८४ टक्के आहे. आतापर्यंत आर.टी.पी.सी.आरच्या ७६ हजार ९८४ चाचण्या झाल्या असून यातील २२ हजार ५२ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ३१ हजार ९१४ अन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १४ हजार ६१६ रुग्ण बाधित आहेत. पालिका क्षेत्रात मनपाच्या शास्त्रीनगर, सावळाराम महाराज महत्रे क्रीडा संकुल, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशन स्कूल, वसंत व्हॅली आदी ठिकाणी ९६८ ऑक्सिजन तर ३४० आय.सी.यु, बेड्स, १२५ व्हेंटीलेटर तसेच खाजगी २६ रुग्णालयात ९०५ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तर टाटा आमंत्रा येथे २४३८, साई निर्वाणा येथे ६३६, शक्तीधाम येथे १७० तर डोंबिवली इंदिरानगर येथे १०० बेड्सचे विलगीकरण केंद्र सुरु आहेत.

पालिका क्षेत्रात ४५ रुग्णवाहिकां असून ऑक्सिजनसहऔषध पुरवठा देखील आहे. सद्यस्थितीत दररोज ८०० चाचण्या केल्या जात असून यामध्ये ५०० च्या आसपास रुग्ण आढळत असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था उभारणे, निर्जंतुकीकरण करणे, लॉकडाऊन काळात अन्नधान्य वाटणे आदी सोयी सुविधा करण्यासाठी आतपर्यंत ४८ कोटी खर्च झाले असून यामध्ये २० कोटी शासनाने दिले आहेत. तर उर्वरित खर्च पालिकेने केला आहे. डिसेंबर पर्यंत कोरोना लढयासाठी २१४ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी सत्यवान उबाळे यांनी दिली. कोरोना लढाई साठी धारवी पँर्टन्, तसेच आपले कुटुंब आपली जाबाबदारी अंतर्गत उपाययोजना सुरू आहेत.

कोरोनाशी लढाई लढताना सेवाभावी संस्था, नागरिक यांनी पुढाकार घेत सामाजिक अंतर नियमांचे पालन, मास्क लावणे, वेळीच उपचार घेणे, कोरोना नियमावलीचे पालन करीत कोरोना लढ्यात महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. दरम्यान याआधी पालिका आयुक्तांनी कोल्हापूर येथे राबविलेला आरोग्य बाबतचा कोल्हापूर पॅटर्न तसेच रायगड येथे राबविलेल्या आरोग्यबाबत उपाययोजनांचा अनुभवातून मे महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता देखील कोविड रुग्णालय सुरु ठेवण्याकडे कल ठेवला. याबाबत विविध माध्यमांतून टीका देखील झाली मात्र आयुक्तांचा हा निर्णय आता उपयोगी येत असल्याचे चित्र दिसत आहे.