ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार; उमेदवारांचा जीव टांगणीला

जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीच्या 994 जागांसाठीची मतमोजणी आज सोमवारी होणार आहे. सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विविध पक्षातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून उघडणार आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले होते. आज याचा निकाल लागणार असून एकप्रकारे गुलालाची उधळण होणार आहे. ग्रामपंचायतीच्या जागेसाठी शुक्रवारी 15 जानेवारी रोजी निवडणूक पार पडली होती. भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ या ठिकाणी निवडणूक पार पडली होती. यामध्ये पूर्णतः बिनविरोध 8 ग्रामपंचायत असणार असून एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झालेल्या 5 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ठाणे (Thane).  जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीच्या 994 जागांसाठीची मतमोजणी आज सोमवारी होणार आहे. सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विविध पक्षातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून उघडणार आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले होते. आज याचा निकाल लागणार असून एकप्रकारे गुलालाची उधळण होणार आहे. ग्रामपंचायतीच्या जागेसाठी शुक्रवारी 15 जानेवारी रोजी निवडणूक पार पडली होती. भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ या ठिकाणी निवडणूक पार पडली होती. यामध्ये पूर्णतः बिनविरोध 8 ग्रामपंचायत असणार असून एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झालेल्या 5 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून भिवंडी ची मतमोजणी भादवड येथील स्व.संपदा नाईक हॉल मधील सभागृहात होणार आहे. शहापुर – मतमोजणी – तहसिलदार यांचे दालन तहसिलदार कार्यालय शहापुर, मुरबाड- माळशेज सभागृह तहसिलदार कार्यालय मुरबाड, कल्याण – मुंबई विद्यापीठ उपकेंद्र कल्याण, गंधारे कल्याण आणि अंबरनाथ – म.गांधी विद्यालय तळमजला सभागृह अंबरनाथ पश्चिम याठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान मतमोजणी च्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा आणि सुव्यवस्थाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मतमोजणी होणाऱ्या जागा ९९४
कल्याण – १६७ जागा
अंबरनाथ -१७२ जागा
भिवंडी – ४६३ जागा
मुरबाड – १६० जागा
शहापुर – ३२ जागा