The sculptures with the nominated boards in the ward are striking This is a topic of discussion in municipal circles
प्रभागातील नामनिर्देशित फलकांसह शिल्पे ठरतात लक्षवेधी; महापालिका वर्तुळात ठरतो आहे चर्चेचा विषय

डोंबिवलीकर प्रसिद्ध चित्रकार सुधाकर नाईक याच प्रभागात राहत असून यांच्या स्वर्गीय पत्नीचे नांव पदपथास दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. चित्रकार सुधाकर नाईक यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागातील गणेश मंदिर एलोरा सोसायटी प्रभाग क्रमाक ६० येथील नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रभागात नामनिर्देशित फलाकांसह सौंदर्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान निगडीत अशी शिल्पे उभारली आहेत. प्रभागातील नागरी समस्या आणि मुलभूत गरजा लक्षपूर्वक सोडविण्यावर भर देऊन प्रभागाची एक वेगळी ओळख आहे. रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या या प्रभागात अनधिकृत फेरीवालामुक्त प्रभाग म्हणूनही गणना प्रभागाची होत असून आता प्रभागातील आकर्षित शिल्पांसह नामनिर्देशित फलक डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या नामनिर्देशित फलकांच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक शैलेश धात्रक, चित्रकार सुधाकर नाईक, राजूसिंग, किशोर पाटील, केतन संघांनी, सचिन सावंत, सुरज गुप्ता, गजेंद्र धात्रक, सुचिता धात्रक, नमिता कीर, प्राची शेलेकर, दिव्या परब, मनाली कदम यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक मनीषा धात्रक यांनी नुकतेच पं. दीनदयाळ मार्गावरील जुन्या टपाल कार्यालयाशेजारी असणाऱ्या गल्लीच्या नामनिर्देशित फलकाचे उद्घाटन केले. सदर गल्लीला स्व.सौ. चित्रा सुधाकर नाईक पदपथ असे नाव देण्यात आले असून या ठिकाणी देखण्या लाफिंग बुद्धाचे शिल्प बसविण्यात आले आहे. डोंबिवलीकर प्रसिद्ध चित्रकार सुधाकर नाईक याच प्रभागात राहत असून यांच्या स्वर्गीय पत्नीचे नांव पदपथास दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. चित्रकार सुधाकर नाईक यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला.

तसेच देवीचौक क्रॉसरोड येथील पदपथाचे नामकरण करण्यात आले. येथे पृथ्वीच्या गोलाकार प्रतिमेवर पुस्तक वाचत असलेला मुलगा आणि लॅपटॉपवर काम करणारी मुलगी अशा शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करणारे शिल्प प्रभागाच्या सौंदर्यात भरच घालत आहे. धात्रक यांच्या प्रभागातील विकास कार्यामुळे प्रभागाची महापालिका वर्तुळात चर्चा होत असते.