The shocking act of not wearing a Dombivli mask; Dogs fired directly at police, seriously injuring police personnel

मास्क न घालणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, काही माथेफिरु मास्क न घालता फिरत आहेत. यांच्यावर कारवाई करणाऱ्यांवर हे दादागिरी करत आहेत. मास्क न घालणाऱ्यांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालेत.

    डोंबिवली : मास्क न घालणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, काही माथेफिरु मास्क न घालता फिरत आहेत. यांच्यावर कारवाई करणाऱ्यांवर हे दादागिरी करत आहेत. मास्क न घालणाऱ्यांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालेत.

    डोंबिवली पूर्व भागातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर झाला आहे. यामुळे शहरात सर्वत्र पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या कारवाई सुरु आहे.

    परिसरात एका ठिकाणी गणेश ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज सुरु होते. या गॅरेजसमोर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता. या दुकानात दोन पाळीव कुत्रे होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना मास्क न घातल्याने पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या तिघांनी कारवाईस विरोध केला. आरडाओरडा सुरु केला. पथकाच्या काही कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये पोलिस होते त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर यांनी आपल्या पळीव कुत्र्याला छू म्हणत पोलिसांच्या अंगावर सोडले. कुत्र्याने अनिल तायडे या पोलीस कर्मचाऱ्याचा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.