राबोडी येथील खात्री अपार्टमेंट इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

राबीडी येथील खात्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलाची पकृती चिंताजनक आहे. सकाळी ०६: ०० वा सुमारास राबोडी येथील खात्री अपार्टमेंट नावाची इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळून खाली पडले, त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले असता दोन मयत झाले असून, एकावर उपचार चालू आहेत.

    ठाणे : राबीडी येथील खात्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलाची पकृती चिंताजनक आहे. सकाळी ०६: ०० वा सुमारास राबोडी येथील खात्री अपार्टमेंट नावाची इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळून खाली पडले, त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले असता दोन मयत झाले असून, एकावर उपचार चालू आहेत.

    दरम्यान बिल्डिंग मधील ७५ कुटुंब बाहेर काढले आहेत. सदर ठिकाणी नगरपालिका अधिकारी तसेच अग्निशमन दल अधिकारी एन डी आर एफ ठाणे पथक व स्टॉप असे हजर आहेत. बिल्डिंग मधील रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याची व पुढील कारवाई महानगरपालिका अधिकारी यांचेशी समन्वय साधून करत आहोत. अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.