मुरबाडमधील ”ते” संशयित दांपत्य  निगेटिव्ह, सध्या क्वारंटाईन

मुरबाड : कोरोना पॉझिटिव्ह भावाला भेटून रायगड जिल्ह्याची सीमा ओलांडून मुरबाडमध्ये आलेल्या डॉक्टरचे व त्याच्या पत्नीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आल्याने मुरबाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 मुरबाड :  कोरोना पॉझिटिव्ह भावाला भेटून रायगड जिल्ह्याची सीमा ओलांडून मुरबाडमध्ये आलेल्या डॉक्टरचे व त्याच्या पत्नीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आल्याने मुरबाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुंबई महापालिकेत कामावर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह  व्यक्तीस त्याचा रायगड जिल्हास्थित डॉक्टर भाऊ भेटला होता, त्यामुळे त्यांची चाचणी करण्याची तयारी रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने केली असतांना हे डॉक्टर महाशय रायगड जिल्ह्याच्या सीमाबंदीचे उल्लंघन करून मुरबाडमध्ये आले होते.प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांचे व त्यांच्या पत्नीचे स्वॅब तपासणीसाठी दिले.
गुरुवारी सकाळी या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मुरबाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.या दांपत्यास सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कडक संचारबंदी व जिल्हाबंदी असतांना ही डॉक्टर व्यक्ती रायगड जिल्ह्याची वेस ओलांडून मुरबाड तालुक्यात आलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.